बुलढाणा : भरधाव दुचाकी आणि एसटी बसची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. मोताळा तालुक्यातील मूर्ती फाटा येथे आज गुरुवारी दुपारी ही दुर्घटना घडली. मोताळा तालुक्यातील कोथळी येथील वैभव गणगे हा लग्नासाठी  मित्रासोबत (एम.एच १९ बि. ए.१२८७ क्रमांकाच्या) दुचाकीने जात होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> फुकट्या प्रवाशांना मोठा दणका…..रेल्वेच्या व्युहरचनेमुळे……

भरधाव वेगाने जात असलेली दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला (एम. एच ४० ए.एन ९९४१) धडकली. यात दुचाकीस्वार वैभव गणगे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र राजू बावणे हा गंभीर जखमी झाला. आहे. परिवहन महामंडळाची बस मेहकर येथून भुसावळला जात होती. बोराखेडी पोलिसांनी दोघांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतर गुन्हा दाखलची कारवाई करण्यात येणार आहे. बोराखेडी पोलिसांनी ही माहिती दिली. राजू बावणे यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth killed one serious after speeding bike collided with a bus in buldhana scm 61 zws