बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे कथित प्रेम प्रकरणातून एका युवकांची हत्या करण्यात आली. यात ‘त्या’ युवतींच्या भावाचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. प्रवीण अजाबराव संबारे (२७, राहणार बेलाड, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा ) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्यांचा भाऊ सचिन संबारे याने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण संबारे हा दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती त्याच्या एका मित्राने प्रवीणच्या भावाला फोनवरून दिली. मिळालेल्या माहितीवरून प्रवीणचा भाऊ सचिन हा मलकापुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पाठीमागे पोहोचला. तिथे त्याला प्रवीण बेशुद्ध अवस्थेत दिसला. त्याला मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात हलवले, त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी प्रवीणला मृत घोषित केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा