१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर प्रियकर आणि त्याच्या मित्राने बलात्कार केला. मुलगी गर्भवती झाल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. पाचपावली पोलिसांनी दोन तरुणांवर गुन्हा दाखल करून अटक केली. मयूर दीपक सातपुते (१९) आणि रोहित रंजित पाटील (२०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा >>> नागपुरातील हिवाळी अधिवेशनात धडकणार हलबांचा मोर्चा
पीडिता १४ वर्षीय असून आठव्या वर्गात शिकते. ती आणि आरोपी तिघेही पाचपावली परिसरात राहतात. मयूरचे पीडितेकडे येणे-जाणे होते. त्याने मुलीना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले व तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. फेब्रुवारी २०२३ पासून पीडितेच्याशेजारी राहणाऱ्या रोहितला ही बाब कळली व त्याने याबाबतकुटुंबियांना सांगण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने आईसोबत डॉक्टरकडे गेली असता गर्भवती असल्याचे समजले. तिने आईला सर्व घटनाक्रम सांगितला.या घटनेची तक्रार पोलिसात करण्यात आली. पोलिसांनी पोक्सो ॲक्ट व इतर कायद्यान्वये गुन्हा नोंदवून मयूर व रोहितला अटक केली.