वर्धा : पैश्यासाठी कोण कोणत्या स्तरावर जाईल याचा नेम राहिला नसल्याचे म्हटल्या जाते. या प्रकरणात तर कळसच झाला. पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या ओम डहाके या विकृत वृत्तीच्या युवकाने लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ प्रसारित केल्याची माहिती बाहेर आली.
पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांना ही माहिती महिला सुरक्षा शाखा व भरोसा सायबर कक्ष यांनी दिली. डहाके हा असे व्हिडीओ नाईट रायडर चॅनलवरून शंभर रुपयात दोन जीबी डेटा याप्रमाणे विकत असल्याचे तथ्य पुढे आले. सायबरचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी तांत्रिक माहिती घेणे सुरू केले.
हेही वाचा – नागपूर : इंस्टाग्राम मित्राने केले तरुणीशी अश्लील चाळे
हेही वाचा – अकोला : अत्याचार पीडित १४ वर्षीय बालिका गर्भवती, न्यायालयाच्या आदेशाने…
आरोपी ओमचे सोशल मीडिया खाते तसेच विविध प्रसारण हस्तांगत करण्यात आले. या माहिती आधारे आरोपी ओम यास अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथून अटक करण्यात आली. मोबाईलची तपासणी केल्यावर असे चॅनल चालवीत असल्याचे सिद्ध झाले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे तसेच नीलेश कट्टोजवार, वैभव कट्टोजवार, नीलेश तेलरांधे, कुलदीप टाकसाळे, अनुप राऊत, विशाल मडावी, अक्षय राऊत, गोविंद मुडे, अमित शुक्ला, अंकित जिभे, प्रतीक वांदीले, स्मिता महाजन, लेखा राठोड यांनी फत्ते केली.