पवनी तालुक्यातील चिचाळ येथील एका तरुणाला मित्रांच्या सोबतीने ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागला. खेळात पैसे हरल्याने वडिलाने त्याला रागावले. यामुळे तरुणाने गोसेखुर्द धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. तब्बल चार दिवसांनंतर या तरुणाचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात सापडला.
अजविल दिलीप काटेखाये (१९, रा. चिचाळ, ता. पवनी) असे मृताचे नाव आहे. मृताचे वडील दिलीप काटेखाये यांच्याकडे पवनी तालुक्यातील चिचाबोळी येथे १.३७ हेक्टर आर सामायिक शेती आहे. अजविल हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अजविलला मित्रांच्या संगतीने मोबाईलमध्ये ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागला. मोबाइलवर गेम खेळण्याच्या आहारी गेलेल्या अजविलला अनेकदा समजावण्यात आले. मात्र, त्याचा छंद काही सुटत नव्हता. अशातच सोमवारी, २९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास कुणाला काहीही न सांगता तो एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागून गोसेखुर्द धरणाच्या पुलावर पोहोचला. पु
हेही वाचा : नागपूर : प्रेमी युगुलाने समाज स्वीकारणार नाही या भीतीपोटी केली आत्महत्या
लावरून त्याने धरणाच्या पाण्यात उडी घेतली. ४ दिवसानंतर त्याचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यातील सावली गावाजवळ सापडला.अजविलला ऑनलाइन गेमचे प्रचंड वेड होते. गेमच्या नादात तो पैसे हरलाही होता. काही दिवसांपूर्वी त्याने दुचाकी विकून ते पैसे गेममध्ये खर्च केले. त्यावरून वडिलांनी त्याला रागावले होते. रागाच्या भरात त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले, असे बोलले जात आहे.