नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चर्चित ‘झिरो डिग्री’ बारवर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी छापा घातला. हा बार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यावेळी ५८ ग्राहक आढळले. हा बार तपन जयस्वाल रा. भेंडे लेआऊट, स्वावलंबीनगर यांच्या मालकीचा आहे. या बारमध्ये अनेक गुंडांचा वावर असतो तर मध्यरात्रीनंतरही हा बार सुरू असतो, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांना मिळाली होती. त्यामुळे रविवारी मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी अनेक तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत होत्या. बार व रेस्टॉरेंटला घालून दिलेली वेळेची मर्यादा उलटल्यानंतरही बार सुरू होता. पोलिसांनी सर्व ग्राहकांना ताब्यात घेऊन बार मालकावर कारवाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zero degree bar action akp