लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर: शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे. या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटासाठी सोडून जाते. राज्यात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. तर विदर्भात १७ मे पासून २८ मे पर्यंत शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५०° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शुन्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा तसेच सूर्य दररोज ०.५०° सरकतो.

हेही वाचा… चंद्रपूर : मुल व बल्लारपूर तालुक्यात ७ गेटेड साठवण बंधारे, ४५ कोटींच्या खर्चास मंजुरी

म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते. भारतात अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे ६.७८° अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्या कुमारी येथे शून्य सावली दिवस येतो. तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो.

हेही वाचा… वर्धा: प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी आंदोलन; पोलीसांनी आंदोलनकर्त्याला केले स्थानबद्ध

महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येते.

हेही वाचा… नागपूरकरांसाठी मेट्रोची खुशखबर, एक महिन्यासाठी मोफत महाकार्ड

भारतातून शेवटी मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून २३.५०° अंशावरून कर्कवृत गेले आहे. त्यामुळे शून्य सावलीचा हा भारतातील शेवटचा भूभाग आहे. भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावली घडत नाही. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात १५.६° अक्षांश ते धुळे जिल्ह्यात २१.९८ ° अक्षांश या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे आपण दुपारी १२.०० ते १२.३५ या वेळादरम्यान सूर्य निरीक्षण करावे. समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात करावे. यासाठी दोन, तीन इंच व्यासाचा, एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप, कोणतीही उभी वस्तू, मनुष्य उन्हात सरळ उभी ठेवावी. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही.

विदर्भातील शून्य सावली दिवस

१७ मे ला अहेरी, आल्लापल्ली, १८ मे ला मूलचेरा, १९ गोंडपिंपरी, बल्लारपूर, २० चंद्रपुर, वाशिम, मुकुटबन, पांढरकवडा, झरी, वणी, दिग्रस, लोणार, २१ गडचिरोली, सिंदेवाही, वरोरा, घाटंजी, मेहकर, २२ यवतमाळ, बुलढाणा, आरमोरी, चिमूर, २३ अकोला, हिंगणघाट, ब्रम्हपुरी, नागभीड, कुरखेडा, देसाईगंज, रामटेक, २४ वर्धा, शेगाव, पुलगाव, २५ अमरावती, दर्यापूर, २६ नागपूर, आकोट, भंडारा, २७ तुमसर, परतवाडा, रामटेक,
२८ मे ला गोंदिया येथे शून्य सावली दिवस दिसणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zero shadow day will be experienced in the state till may 31 rsj 74 dvr