नागपूर: जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन मधिल १३७ पदांसाठी ऑनलाईन परीक्षा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात २१ पदांसाठी चार दिवस परीक्षा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या वेळापत्रक भाग-२,  ७ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आले आहे. या जिल्हा परिषद परीक्षेची तारीख २०२३ भाग २ मध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता(विद्युत), वायरमेन, फिटर आणि पशुधन पर्यवेक्षक या पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद भरती २०२३ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ७ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जाहीर वेळापत्रकानुसार कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाची परीक्षा १५ ऑक्टोबर २०३ रोजी होणार आहे. तर वायरमेन, फिटर आणि पशुधन पर्यवेक्षक पदाची परीक्षा १५ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. या लेखात पदानुसार परीक्षेची तारीख, शिफ्ट्स, परीक्षेची वेळ इत्यादी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी विविध संवर्गातील एकूण १९ हजार ४६० पदाच्या भरतीसाठी जिल्हा परिषद भरती २०२३ जाहीर केली होती.  

जिल्हा परिषद भरती परीक्षा भाग-१-   ०७, ०८, १० आणि ११ ऑक्टोबर.

जिल्हा परिषद भरती परीक्षा भाग-२-   १५ आणि १७ ऑक्टोबर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zilla parishad exam part two dates announced dag 87 ysh
Show comments