कविता नागापुरे

भंडारा: काँग्रेस सोबत हातमिळवणी करून भंडारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणारे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील विद्यमान जि. प. उपाध्यक्ष संदीप टाले आज सकाळपासून ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते भाजपला शरण जाणार असल्याच्या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला असल्याचे बोलले जात आहे. टाले यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने त्यांचे उपाध्यक्ष पद धोक्यात आले होते. स्वतःचे पद वाचविण्यासाठी अखेर संदीप टाले ही शरणागती पत्करण्यास तयार झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र माजी आ. चरण वाघमारे यांचे अत्यंत निकटवर्ती समजले जाणारे टाले यांनी चरण वाघमारे यांची साथ सोडून भाजपला शरण जाणे अनेकांच्या पचनी पडलेले नाही.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?

५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत १० मे २०२२ रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी निवडणूक झाली होती. कॉंग्रेसच्या २१ सदस्यांनी भाजपमधून निष्कासीत करण्यात आलेले चरण वाघमारे यांच्या ६ सदस्यांसोबत मिळून (भाजप ५+१ अपक्ष) सत्ता स्थापन केली. यात कॉंग्रेसचे गंगाधर जिभकाटे अध्यक्ष बनले आणि चरण वाघमारे गटाचे संदीप टाले उपाध्यक्ष झाले. मात्र त्यावेळी भाजपचे जिल्हा परिषद गटनेते विनोद बांते यांचा व्हिप झुगारून भाजपच्या ५ सदस्यांनी कॉंग्रेसला समर्थन दिले, याबाबत भाजपने तत्कालीन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. पक्षाशी बंड करणाऱ्या उपाध्यक्षासह चारही जिल्हा परिषद सदस्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर जि. प. सदस्य दिलीप सार्वे आणि बनकर हे भाजपकडे परत गेले.

हेही वाचा… आपल्या मुलाचा शाळेतील प्रवास सुरक्षित आहे काय? नागपुरात ९३८ वाहनांवर कारवाई..

मात्र त्यांच्यावरील खटला अद्यापही मागे घेण्यात आलेला नसल्याची माहिती आहे. आता उर्वरित तिघांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम होती. कायद्यात तरतूद नसल्याने या तिघांवरील अपात्रतेचा खटला मागे घेता येणार नाही असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संदीप टाले यांच्यासह अन्य दोघांच्या अपात्रतेची सुनावणी लवकरच भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या कोर्टात होणार होती. ही सुनावणी होऊन तिघेही लवकरच अपात्र होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते.

हेही वाचा… चंद्रपूर: आमदार सुभाष धोटे यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

दरम्यान संदीप टाले यांच्यावरील अपात्रतेचा खटला मागे घेऊन त्यांना माफीनामा देणार असे भाजपकडून सांगण्यात आल्याची खात्रीजमा माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे अखेर धोक्यात आलेले उपाध्यक्ष पद वाचविण्यासाठी संदीप टाले भाजपला पुन्हा शरण जात असल्याची माहिती आहे. संदीप टाले हे बीआरएस नेते चरण वाघमारे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्ती समजले जातात. वाघमारे यांच्यामुळेच त्यांना जि. प. उपाध्यक्ष पदही मिळाले मात्र असे असताना वाघमारे यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश न करता किंवा वाघमारे यांचे हात बळकट करण्यास साथ न देता टाले यांनी भाजपलच साथ का दिली याबाबत चरण वाघमारे यांना विचारणा केली असता या प्रश्नाचे उत्तर टालेच देतील असे त्यांनी सांगितले. टाले यांच्याकडून सध्या कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.