वर्धा : ग्राम विकास विभागातर्फे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील तीस संवर्गात १९ हजार ४६० पदे सरळ सेवेने भरल्या जात आहे. इच्छुकांना २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस कंपनीतर्फे करण्यात येत आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. जिल्हा परिषदांना परीक्षेचे केंद्र बदलण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
हेही वाचा – भाजपा नेत्या सना खानच्या खुनामागे नेमके कारण काय? मृतदेहाचा नव्याने शोध सुरू
हेही वाचा – राज्यात विजेची मागणी पुन्हा वाढली
कोणतीही जिल्हा परिषद एखादे केंद्र रद्द करू शकते. तसेच गरजेनुसार केंद्रात वाढही करू शकते. उमेदवारांनी पर्याय म्हणून दिलेल्या केंद्राव्यतिरिक्त जिल्हा परिषदेकडून इतरही केंद्र दिले जावू शकतात, असे कंपनीतर्फे खबरदार करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन परीक्षेच्या तारखेबाबत उमेदवारांनी सातत्याने जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ पाहण्याची सूचना आहे. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरल्याच्या पावतीची प्रिंट जपून ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही अडचण आल्यास त्याची गरज पडू शकते.