वाशिम : जिल्हा परिषदअंतर्गत ग्रामीण भागात ७७० शाळा आहेत. त्यापैकी ३५० वर्ग खोल्या शिकस्त झालेल्या आहेत. तर १५० वर्ग खोल्या जीर्ण अवस्थेत असून बहुतांश शाळेत स्वच्छ्ता गृहे नाहीत. कुठे आहेत तर घाणीने माखली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. तरीही गोर गरिबांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकत आहेत. एकीकडे जिल्हा परिषद शाळांची अवस्था दयनीय आहे तर दुसरीकडे मात्र शिक्षण विभागाचा कार्पोरेट लूक सजला आहे. त्यामुळे सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते की, शिक्षा असा प्रश्न पालकामधून होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे. खासगी शाळेत मिळणाऱ्या सोईसुविधा जिल्हा परिषद शाळेत मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार पालकांमधून होत आहेत. दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळेवर खर्च केल्याचे सांगितले जाते मग त्या निधीचे काय होते. असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद होण्याच्या वाटेवर आहेत. अनेक शाळेत शिक्षक नसल्याची ओरड होत आहे. मात्र सरल भरती प्रक्रिया न झाल्याने अनेक शाळा शिक्षकाविना आहेत. बहुतांश शाळेत वर्ग खोल्या नाहीत. त्यामुळे गावातील संस्थान येथे शाळा सुरू आहेत. जिल्हा परिषद अनेक शाळांच्या पायाभूत सोईसुविधा करिता निधी देत असून काही शाळा सुधारण्यात येत आहेत. काही जिल्हा परिषद शाळेत चांगल्या सोईसुविधादेखील असून विद्यार्थी संख्याही मोठी आहे.

हेही वाचा – गोंदिया: ७० हजाराच्या लाचप्रकरणात वडेगावच्या सरपंचासह तिघे एसीबीच्या जाळ्यात

हेही वाचा – “ना कबुतर आया, ना फोन…”, ॲड. प्रकाश आंबेडकर असे का म्हणाले?

डोंगराळ व दुर्गम भागातील गोर गरीब विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेचाच आधार आहे. मात्र सोईसुविधांचा प्रचंड अभाव आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ७७० शाळा आहेत यापैकी २३० शाळांच्या ३५० वर्ग खोल्या शिकस्त झाल्या असून जवळपास १५० वर्गखोल्या जीर्ण होऊन धोकादायक अवस्थेत आहेत. पाऊस आला की अनेक शाळा गळतात. अनेक शाळेत स्वच्छ्ता गृहे नाहीत, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी पालक, शिक्षक प्रेमीमधून होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zp school in washim district are in bad condition pbk 85 ssb