कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहिल्याने वाद निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये १९ मे रोजी पार पडलेल्या लग्न समारंभात गिरीश महाजन उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलिसांना या संदर्भात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. हिंदुस्तान टाईम्सने याबद्दलचे वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे या जंगी विवाह सोहळ्यास लोकप्रतिनिधींसह बुकी आणि अन्य मान्यवर मंडळींसह पोलिसांनी हजेरी लावली. त्यामुळे या प्रकरणी नेमकी कोणावर कोणती कारवाई केली जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभाच्या व्हिडिओ क्लिप्स आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीने बुधवारी दाखवल्या होत्या. नाशिकचे पालकमंत्री असलेले गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे महाजन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभाला उपस्थित राहिल्याने मुख्यमंत्र्याच्या समोरील अडचणी निर्माण झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या समारंभाला पोलीसदेखील उपस्थित राहिल्याने मुख्यमंत्र्यांच्या गृह खात्याचीदेखील नाचक्की झाली आहे.

Dudhganga tap water scheme,
इचलकरंजीची दूधगंगा नळपाणी योजना रखडल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राजू शेट्टी यांचे टीकास्त्र
Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?

वाचा- दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नातील हजेरी पोलिसांना महागात

दाऊद इब्राहिमच्या पत्नीच्या भाचीच्या विवाह सोहळ्याला गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे अनेक आमदार उपस्थित होते. याबद्दल गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांकडे स्पष्टीकरण दिले आहे. ‘मुलीचे काका शाहर खातेब यांनी लग्नाचे आमंत्रण दिले होते. खातेब नाशिकमधील धार्मिक नेते असून ते आरोग्य विभागाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. मात्र ते दाऊदचे नातेवाईक आहेत, याबद्दल मला कल्पना नव्हती,’ असे महाजन यांनी म्हटले.