लोकसत्ता टीम

नाशिक : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी विविध धार्मिक विधींसाठी भाविकांची मांदियाळी असते. याशिवाय कुंभनगरी म्हणुन त्र्यंबकेश्वरला विशेष महत्व आहे. भाविक तसेच पर्यटकांची सातत्याने गर्दी असतानाही राज्य परिवहन महामंडळासह प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष झाल्याने पाच वर्षाहून अधिक काळ होऊनही त्र्यंबकेश्वर बस स्थानकाचे काम पूर्ण झालेले नाही. संत निवृत्तीनाथ यात्रेपर्यंत तरी बस स्थानकाचे काम पूर्ण होईल काय, असा प्रश्न वारकऱ्यांकडून विचारला जात आहे.

Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Madhureema Raje Chhatrapati
Shahu Chhatrapati : “…म्हणून मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे”, अखेर शाहू छत्रपतींनी सोडलं मौन; म्हणाले…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Shortage of buses at Yeola and Lasalgaon depots Chhagan Bhujbal demands to action
येवला, लासलगाव आगारांना बसेसचा तुटवडा, कार्यवाही करण्याची छगन भुजबळ यांची मागणी
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Maharashtra Assembly Election 2024 _ BJP
Assembly Election: भाजपाने अखेर बंडखोरांना हिसका दाखवला; ४० नेत्यांवर उगारला कारवाईचा बडगा
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तिंलिंगापैकी एक ठिकाण असल्याने या ठिकाणी शिवभक्तांसह धार्मिक विधी, कार्यक्रमांसाठी सातत्याने भाविकांची गर्दी असते. याशिवाय हा परिसर डोंगरांजवळ असल्याने पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या कमी नाही. शिवस्थान असल्याने श्रावणासह प्रत्येक रविवार, सोमवार या ठिकाणी गर्दी असते. भाविक तसेच पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर दररोज गर्दी होत असताना या गर्दीचा महसूल वाढविण्यासाठी उपयोग करुन घेण्यात राज्य परिवहन महामंडळ कमी पडत आहे. त्र्यंबकमध्ये येणारे भाविक तसेच पर्यटकांचा राबता पाहता तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी निधी मंजूर केल्यानंतर त्र्यंबकेश्वरमधील जुन्या बस स्थानकाचे नुतनीकरण करण्याचे २०१८ मध्ये ठरविण्यात आले. या कामाचे भूमिपूजन होऊन पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी अद्याप स्थानकाचे काम पूर्ण झालेले नाही. मध्यंतरी करोनामुळे वर्षभर काम बंद होते.

आणखी वाचा-नाशिक : शोषखड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू

जुन्या बस स्थानकाचे नुतनीकरणाचे काम सुरु असल्याने जव्हार फाट्यासमोरील मोकळ्या जागेत स्थानक स्थलांतरीत झाले आहे. परंतु, या ठिकाणी स्वच्छतागृह किंवा अन्य व्यवस्था नसल्याने प्रवाशांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे, या स्थानकापासून त्र्यंबक देवस्थान मंदिर काहीसे लांब असल्याने रिक्षाचालक बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवासी, भाविकांची लूट करत आहेत. मंदिरापर्यंत सोडण्याचे ५० ते १०० रुपये घेत आहेत. रिक्षाचालकांची दादागिरी हा स्थानिकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी स्थानक सेवेसाठी कधी खुले होणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात २५ जानेवारी रोजी होणाऱ्या संत निवृत्तीनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन सोहळा लवकर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

आणखी वाचा-सहकार भारतीच्या माजी प्रदेशाध्यक्षा डॉ. शशीताई अहिरे यांचे निधन

बस स्थानक लवकरच खुले

त्र्यंबक बस स्थानकाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी गाळे, चालक-वाहकांसाठी विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, निरीक्षकांसाठी खोली. स्वच्छतागृह आदी व्यवस्था करण्यात आली आहे. हे बस स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी खुले होणार आहे. -किरण भोसले (विभागीय वाहतूक अधिकारी)

Story img Loader