लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित अनुवंशिक आजार असून त्यावरील उपचारासाठी रुग्णांना केंद्र सरकारकडून १० लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे. मुंबईतील दोन रुग्णालयांसह देशातील एकूण १० रुग्णालयांमध्ये ही सुविधा मिळणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
Ajit Pawar visits accident site decides to provide Rs 5 lakh assistance to families of deceased
अपघातस्थळी अजित पवार यांची भेट, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय
liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
Atal Bihari Vajpayee Sand Sculptures, Bhatye Beach,
रत्नागिरी : भाट्ये समुद्रकिनारी अटलबिहारी वाजपेयींचे वाळूशिल्प
Maitri Clinic , Clinic , Maitri Clinic for boys and girls,
किशोरवयीन मुला-मुलींसाठी ‘मैत्री क्लिनिक’ ठरतेय आधार! साडे सोळा लाख मुला-मुलींना मार्गदशन…
TB survey in Satara, 160 teams for TB survey ,
साताऱ्यात क्षयरुग्ण सर्वेक्षणासाठी १६० पथके

या उपक्रमांतर्गत सूचिबद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह भारतातील १० नामांकित रुग्णालयांचा समावेश आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. थॅलेसेमिया आजारामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा कमी होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २०१७ पासून थॅलेसेमिया बाल सेवा योजना राबवली जाते. या योजनेचा दुसरा टप्पा नुकताच पूर्ण झाला. कोल इंडियाच्यावतीने, सामाजिक दायित्व निधीतून हा उपक्रम राबवला जात आहे. त्यात वंचित घटकांतील थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण, ज्यांच्याकडे वैद्यकीय स्थितीनुसार प्रत्यारोपणासाठी जुळणारे दाते आहेत, परंतु या प्रक्रियेचा खर्च भागविण्यासाठीची आर्थिक क्षमता अथवा स्रोत नाही, अशा रुग्णांना या आजारातून मुक्त होण्यासाठी एकदाच करायच्या उपचारांची संधी उपलब्ध करून दिली जाते.

आणखी वाचा-अमळनेरला विवाहितेचा उष्माघाताने मृत्यू

या उपक्रमांतर्गत आतापर्यंत देशभरातील १० रुग्णालयांमध्ये थॅलेसेमिया रूग्णांवरील अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची ३५६ प्रकरणे यशस्वीरित्या पूर्ण केली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या औचित्याने आरोग्य मंत्रालयाच्या थॅलेसेमिया बाल सेवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. थॅलेसेमिया बाल सेवा योजना पोर्टलही सुरू करण्यात आले. थॅलेसेमिया बाल सेवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात प्रति रक्तद्रव निर्मिती (प्लाझ्मा) मूल पेशी प्रत्यारोपणासाठी १० लाख रुपयांपर्यंतच्या खर्चासाठी मदत दिली जाणार आहे. ही मदत कोल इंडिया लिमिटेडकरून प्रत्यारोपण करणाऱ्या संस्थांना थेट हस्तांतरित केली जाईल. या उपक्रमामुळे वंचित घटकांतील थॅलेसेमियाग्रस्त रूग्ण आणि वाढ खुंटवणाऱ्या अशक्तपणाने ग्रस्त रुग्णांना मोठा लाभ होणार असून गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. पवार यांनी केले.

Story img Loader