मेहनत करूनही वाढ नसल्याने नाराजी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारत प्रतिभृती मुद्रणालय आणि टांकसाळ महामंडळाच्या (एसपीएमसीआयएल) कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली आहे. नोटाबंदीच्या काळापासून दिवस-रात्र मेहनत करूनही बोनसच्या रकमेत वाढ न केल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तर बोनसच्या लाभापासून आयडीए पद्धती स्वीकारलेल्या आणि अधिकारी वर्गाला वगळण्यात आल्याचे नाराजीचे वातावरण आहे.

दोन वर्षांपूर्वी देशातील आयएसपी, सीएनपीसह नऊ युनिटमध्ये महामंडळाच्या कामगार, निरीक्षक, अधिकारी यांची एकूण दहा हजार ३५४ संख्या होती. ती चालू वर्षांत ३४९ अधिकारी, ११०० निरीक्षक आणि ८१८९ कामगार अशी एकूण नऊ हजार ६३८ इतकी कमी झाली आहे. या परिस्थितीत महामंडळाला ६६३.७७ कोटीचा नफा झाल्याने व्यवस्थापनाने केंद्र सरकारला २०४ कोटींचा लाभांस सुपूर्द केला आहे. अशा आर्थिक स्थितीत केंद्र सरकारच्या मालकीच्या मिनीरत्न एक दर्जा असलेल्या प्रतिभृती मुद्रणालय आणि टांकसाळ महामंडळाने देशातील मुद्रणालये, टाकसाळ तसेच कागद कारखान्यातील कामगारांना गेल्या वर्षीप्रमाणे १० हजार रुपये सणोत्सव बोनस जाहीर केला आहे. नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाच्या अंमलबजावणीत २०१६ पासून अविरत काम केल्याने यंदा बोनसमध्ये वाढीची अपेक्षा होती.

मात्र, बोनस वाढ झाली नसल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे. प्रेस महामंडळाने निरीक्षक, कामगार वर्गासाठी बोनसची घोषणा केली आहे. अधिकारी वर्गाला त्यातून वगळले. दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय झाला आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. देशात नोटा टंचाई निर्माण होऊ नये म्हणून प्रेस कामगारांनी राष्ट्रीय, साप्ताहिक सुटी न घेता, अगदी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशभरातील कामगारांना सुटी घोषित करण्यात आली असतानाही प्रेस कर्मचाऱ्यांनी अविरत काम करून देशाची नोटांची गरज भागविण्यात मोलाचे योगदान दिले. एका बाजूला चलनी नोटा छपाईत कोटय़वधी खर्च झाल्याचे रिझव्‍‌र्ह बँक सांगते तर दुसरीकडे नोटा छपाईत अविरत योगदान दिलेल्या कामगारांना मात्र कोणतीही वाढ देत नाही, हा भ्रमनिरास आहे.     -रामभाऊ जगताप (माजी सरचिटणीस, भारत प्रतिभृती मुद्रणालय मजदूर संघ)