लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुटखा विरोधी अभियानात अवैधरित्या गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर १०९ गुन्हे दाखल करण्यात आले असून एक कोटी ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर

जिल्ह्यात सद्यस्थितीत पानटपऱ्या, गोदाम, इतर आस्थापनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या अभियानादरम्यान १०९ गुन्हे दाखल करण्यात आले असून एक कोटी ३६ लाख सहा लाख ७८५ रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आलेला आहे. ११५ संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे. नाशिक ग्रामीण घटकांतील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी १२ पथके कार्यरत असून त्यांच्याकडून तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांकडून सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यात येत आहे. गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविषयी नागरिकांना काही माहिती असल्यास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ६२६२२५६३६३ या मदतवाहिनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.