प्रणव माळीने रुग्णालयातून परीक्षा दिली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

परीक्षेच्या काळात एखाद्या विषयाचा बाऊ करत किंवा निकालाचा ताण घेत विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची उदाहरणे घडत असतात. मात्र आपल्यातील काही उणिवांवर मात करत लढण्याची जिद्द बाळगणारे विरळाच. सध्या १० वीची परीक्षा सुरू असून ओझर येथील प्रणव माळी अपघातग्रस्त झाला असतानाही शुक्रवारी त्याने रुग्णालयातून भूगोलाची प्रश्नपत्रिका सोडवली. शिक्षण मंडळाने तातडीने केलेल्या सहकार्यामुळे हे सर्वकाही शक्य झाले. प्रणव हा ओझरच्या एच.ए.एल. विद्यालयात आहे. विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण येऊ नये यासाठी दोन विषयांच्या परीक्षांमध्ये सुटी देण्यात येत असल्याने परीक्षा काही अंशी लांबली आहे. शुक्रवारी १० वीची भूगोल विषयाची शेवटची परीक्षा होती. भूगोलाचा अभ्यास करून कंटाळलेला प्रणव गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास घराबाहेर पडला. खेळण्याच्या नादात पाय घसरल्याने तो लोखंडी जिन्यावरून घरंगळतच गेला. तो जखमी झाल्याने पालकांनी त्यास जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. परीक्षेचा शेवटचा दिवस राहिला असताना असा प्रकार झाल्याने प्रणवसह त्याचे पालकही चिंतातुर झाले होते.

परीक्षा न दिल्यास वर्ष वाया जाण्याची भीती. प्रणवची अवस्था पाहता त्याने परीक्षा देऊच नये असे पालकांना वाटत होते. मात्र त्याच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालकांनी शिक्षण सचिव नितीन उपासनी यांच्याशी संपर्क साधला. घडलेला प्रकार सांगत प्रणवसाठी परीक्षेला काही तास शिल्लक असताना काही करता येईल का? अशी विचारणा केली.  प्रणवला तातडीने पंचवटीतील क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना जवळच्या स्वामी नारायण शाळेच्या केंद्रातून त्याच्यासाठी भूगोलाची प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पाठविण्यात आली. उत्तरपत्रिका लिहित असतांना देखरेखीसाठी दोन निरीक्षक नेमण्यात आले. हाताला सलाईन तसेच अन्य ठिकाणी दुखापत असतांनाही प्रणवने भूगोलाची प्रश्नपत्रिका सोडवली.