लोकसत्ता वार्ताहर
धुळे: जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर (ता.शिरपूर) शिवारात मंगळवारी सकाळी भरधाव कंटेनर महामार्गालगत असलेल्या हॉटेलमध्ये शिरुन उलटला. तत्पूर्वी कंटेनरने हाॅटेल परिसरात उभ्या असलेल्या नऊ गाड्यांना धडक दिली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ४० जण जखमी झाले आहेत. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक यंत्रणेने घटनास्थळाकडे धाव घेत तातडीने बचाव कार्य सुरू केले आहे.