अमरावतीनजीकच्या मालखेड गावाजवळ कोळशाने भरलेल्या मालवाहू रेल्वेगाडीचे २० डबे रविवारी मध्यरात्री घसरल्यामुळे भुसावळ-वर्धा मेमू गाडीसह १२ रेल्वेगाड्या सोमवारी रद्द करण्यात आल्या आहेत. अपघातामुळे नागपूर-मुंबईदरम्यान वाहतूक नरखेडमार्गे वळविण्यात आली आहे. यामुळे दिवाळीसाठी गावाकडे जाणार्‍या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> सातपूर औद्योगिक वसाहतीत विजेची हेराफेरी ? ; स्वत:चे देयक दुसऱ्याच्या माथी मारल्याची तक्रार

मालगाडीचे एकापाठोपाठ एक २० डबे रुळावरून घसरले. त्यामुळे मोठा आवाज आला. इंजिन रुळाच्या एका बाजूला घसरले, तर काही डबे रुळावरच आडवे पडले. परिणामी रेल्वे वाहतूक विस्कळित झाली. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून असून, त्यांच्याकडून रात्रीपासूनच रूळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. सोमवारी सकाळी या कामाला अधिक गती देण्यात आली आहे.  सध्या दोनशे-सव्वादोनशे कर्मचारी दुरुस्तीचे काम करीत आहेत. लवकरच हा मार्ग सुरळीत होईल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.

हेही वाचा >>>जळगाव : मुक्ताईनगरमध्ये गुटखा तस्करी; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

रद्द झालेल्या गाड्या.                                     

वर्धा-भुसावळ गाडी रद्द करण्यात आली आहे. नागपूर- सीएसएमटी गाडी धामणगाव ते नागपूरपर्यंत धावणार आहे. अमरावती-नागपूर , गोंदिया-कोल्हापूर, वर्धा-अमरावती,  नरखेर-काचेगुडा , भुसावळ-वर्धा, गोंदिया- सीएसएमटी, नागपूर-पुणे , अजनी-अमरावती, नागपूर- सीएसएमटी, नागपूर-वर्धा या गाड्या सोमवारी  रद्द करण्यात आल्या आहेत.