लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: गुवाहाटी येथे व्यापाऱ्याने पाठविलेली साडेतेरा लाखांची डाळिंबे वाहनचालक आणि सहायकाने परस्पर लंपास केल्याचे उघड झाले आहे.

याबाबत डाळिंब व्यापारी सरताज खान (मूळ रा. कानपूर, हल्ली समर्थनगर, आडगाव) यांनी तक्रार दिली. अंकित सेंगर (कानपूरनगर, उत्तरप्रदेश) आणि राहुल यादव (रा.सेल्वासा) असे संशयित चालक आणि सहायकाचे नाव आहे. खान यांनी गेल्या बुधवारी नाशिक बाजार समितीत आसाम राज्यातील गुवाहाटी येथे पोहचविण्यासाठी डाळिंब खरेदी केली होती.

हेही वाचा… Citylink बससेवेत अपंगांना मोफत प्रवास कार्डला मुदतवाढ

माल त्यांनी मालवाहूतक करणाऱ्या मालमोटारीत भरला. सुमारे १७ लाख २४ हजाराच्या डाळिंब मालासह त्यांनी वाहनात गॅस शेगड्या भरून गुवाहाटीच्या दिशेने रवाना केला होता. मात्र संशयितांनी हा माल गुवाहाटी येथे पोहचविला नाही. संपर्क होऊ न शकल्याने खान यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader