लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: वनविभागातर्फे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्ह्यातील यावल अभयारण्यासह मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्प आणि अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या गणनेत १३८ प्राण्यांची नोंद करण्यात आली. यावेळी जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे असलेल्या भागात मचाणी उभारून रात्रभर चंद्राच्या उजेडात प्राण्यांचे निरीक्षण करून त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. या गणनेत पट्टेदार वाघ, तरस, अस्वल, रानडुक्कर, रानससे, नीलगाई, लोधडी, चितळ, रानगवा, माकडे, हरीण, चिंकारा आदी प्राणी आढळले.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई

मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्पासह यावल अभयारण्यात वन्यजीव, प्रादेशिक विभागात प्राणी गणना झाली. त्यात मुक्ताई व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघाचे, तर यावल अभयारण्यात बिबट्याचे दर्शन झाले. जंगलातील धरण, नद्यांसह बंधारे व कृत्रिम पाणवठ्यांजवळ मचाणी उभारण्यात आल्या होत्या.

हेही वाचा… पाणीपुरवठामंत्र्यांच्या धरणगावमध्ये हंडाभर पाण्यासाठी वणवण; २२ दिवसांपासून नागरिक हैराण

प्राणी गणनेत जळगावचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, धुळ्याचे वनसंरक्षक दिगंबर पवार, सहायक उपवनसंरक्षक उमेश बिराजदार, वन्यजीवचे वनरक्षक अधिकारी अमोल चव्हाण, प्रादेशिक विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख, रावेर वनक्षेत्राचे सहायक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, डोलारखेडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे, सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे हेमराज पाटील (चोपडा), चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे संकेत पाटील, अंकित पाटील (रावेर) आदींसह जळगावातील १० न्यायाधीशांचाही प्राणी गणनेत सहभाग होता