९०७ नवीन रुग्णांची भर

नाशिक : २४ तासात जिल्ह्यात करोनाचे ९०७ रुग्ण आढळले असून ११०१ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. १४ रुग्णांचा मृत्यू झाला. करोनाबाधितांचा आकडा ८१ हजारवर पोहोचत असताना त्यातील ७० हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. करोनामुळे आतापर्यंत १४५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी जिल्ह्यात ११०१ रुग्ण बरे झाले. तर नवीन ९०७ रुग्ण आढळले. यात ग्रामीण भागातील २१०, नाशिक शहर ६७४, मालेगाव २० आणि जिल्हाबा तीन रुग्णांचा समावेश आहे. तर मागील २४ तासात नाशिक महापालिका क्षेत्रातील १२ तर ग्रामीण भागातील दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा ८१ हजारावर पोहचला आहे. त्यातील ७० हजारहून अधिक जण बरे झाले. सद्य:स्थितीत जवळपास नऊ हजारहून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८६.३४ टक्के आहे. नाशिक ग्रामीणमध्ये ७५.२९, नाशिक शहरात ९०.०५, मालेगावमध्ये ८५.१६ तर जिल्हा बा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७३.७५ टक्के आहे.

सद्य:स्थितीत नाशिक तालुक्यात ६०६, चांदवड २०२, सिन्नर ८५८, दिंडोरी २६०, निफाड ११६३, देवळा १५७, नांदगाव ३३०, येवला १२३, त्र्यंबकेश्वर १६३, सुरगाणा ३८, पेठ ३५, कळवण १७१,  बागलाण २६२, इगतपुरी २२८, मालेगाव ग्रामीण ३३८  असे एकूण चार हजार ९३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात चार हजार ५२,  मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ४११,  तर जिल्ह्याबाहेरील १११ असे रुग्ण उपचार घेत आहेत.

मनमाड नगरपालिका तीन दिवस बंद

मनमाड नगरपालिकेला पुन्हा एकदा करोनाचा विळखा बसला आहे. पालिकेत पुन्हा करोनाने प्रवेश केल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली. नगर परिषद कार्यालयातील दोन कर्मचारी बाधित आढळल्याने नगर परिषदेच्या कार्यालयाचे कामकाज तीन दिवस म्हणजे ७ ऑक्टोबरपर्यंत बंद राहाणार आहे. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही पालिका कार्यालयात येऊ  नये, काही समस्या असल्यास पालिकेच्या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Story img Loader