जळगाव : यावल शहरासह परिसरात दुचाकींची अवैध खरेदी-विक्री तसेच शेती साहित्याची चोरी करुन ते विकणार्‍या २० ते २५ संशयितांना पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात १४ संशयितांचा दुचाकी बेकायदा खरेदी-विक्री, शेती साहित्याची विक्री यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यावल शहरातून दोन वर्षांत दुचाकी आणि शेती साहित्य चोरीस गेल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. काही दुचाकी विनाक्रमांकाच्या, विना परवाना असलेल्या होत्या. तसेच ट्रॅक्टर, रोटाव्हेटरसह इतर शेती साहित्य लंपास करीत खरेदी-विक्री करणार्‍यांची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळाली. त्यांनी यावल येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांना चौकशीसह कारवाईच्या सूचना केल्या.

हेही वाचा >>> बोलताना अडखळणे आता दूर; साक्री ग्रामीण रुग्णालयात ५० बालकांवर शस्त्रक्रिया

त्याअनुषंगाने निरीक्षक मानगावकर यांच्या नेतृत्वात पथकाने शनिवारी शहरातील काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. त्यात दुचाकी बेकायदा खरेदी-विक्री करीत असलेले, तसेच शेती साहित्य चोरी करीत विक्री करीत असलेले १४ संशयित निष्पन्न झाले. याप्रकरणी यावल येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु आहे.