जळगाव – हतनूर धरणाच्या जलाशयावर आशियाई पाणपक्षी गणनेत १४९ पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. याप्रसंगी स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांचाही अभ्यास करण्यात आला. त्यात 35 पक्षी निरीक्षकांनी सहभाग नोंदविला.

मुक्ताईनगर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व चातक निसर्ग संवर्धन संस्था यांच्यातर्फे हतनूर धरणाच्या जलाशयावर आशियाई पाणपक्षी गणना १२फेब्रुवारी रोजी पार पडली. त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. या पक्षी गणनेत जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, मुक्ताईनगर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कृपाली शिंदे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, शिल्पा गाडगीळ, उदय चौधरी, सौरभ महाजन, सत्यपालसिंग, समीर नेने, संजय नेने, राहुल चव्हाण, पार्थ बर्‍हाडे यांच्यासह 35 पक्षी निरीक्षकांनी सहभाग नोंदविला, असे उपवनसंरक्षक होशिंग यांनी सांगितले.

When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
29 villages Vasai Virar, Vasai Virar Municipal Corporation, Vasai Virar,
२९ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश, ३१ हजार हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी
Patkar plaza parking latest marathi news
डोंबिवलीत पालिकेचे पाटकर प्लाझा वाहनतळ सांडपाण्याने तुंबले
turtles, rescue missions, Wildlife Treatment Center,
बचाव मोहिमांमधून ४१९ कासवांना जीवदान, वन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्रामध्ये उपचार
incident of Lonavala Municipal Council discharging sewage directly into rivers Pune news
लोणावळा नगर परिषदेकडून जलप्रदूषण! सांडपाणी थेट नद्यांत सोडल्याचा धक्कादायक प्रकार

हेही वाचा >>> नाशिक : शिकारीचा डाव उलटला, मांजरीसह बिबट्या पडला विहिरीत, अशी झाली सुटका..

उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या या पाणपक्षी गणनेच्या दिवशी १४९ पक्षी प्रजाती आढळून आल्या. त्यात हतनूर धरणाचे मानचिन्ह असलेले मोठी लालसरी, त्याचप्रमाणे वारकरी, वैष्णव, तलवार बदक, शेंडी बदक, भिवई बदक, दलदली हरीण पक्षी, ठिपकेदार होला आदी पक्षी मोठ्या संख्येने दिसून आले. चांगदेव, खामखेडी, मेहूण, चिंचोल, हतनूर, तांदलवाडी या पाच ठिकाणी पक्षी गणना करण्यात आली. हतनूर धरण परिसरातील नदीपात्रात बोटींमधून भ्रमंती करून दुर्बीण व कॅमेर्‍याच्या सहाय्याने स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांचा अभ्यास केला गेला. देश-विदेशातून येणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांची मोठी संख्या पाहता, हतनूर धरण जलाशयास महत्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र हा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.

Story img Loader