जळगाव – मंगळवारी सकाळी पाचोरा शहरातील जळगाव चौफुलीजवळील मोंढाळे रस्त्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस आणि मालमोटार यांच्यात समोरासमोर धडक झाली. त्यात पंधरा शालेय विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी झाले. सातगावहून पाचोरा येणार्‍या बसला मोंढाळे फाट्याजवळील मौनगिरी साखर कारखान्यानजीक हा अपघात झाला. जखमींना हलविण्यासाठी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, तासाभरानंतर ती आल्यानंतर जखमी विद्यार्थ्यांसह प्रवाशांना पाचोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचा पालकांनी मिळेल त्या वाहनाने घटनास्थळी धाव घेतली. काहींना ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. दरम्यान, मोंढाळे रस्ता अरुंद असून, रस्त्यालगत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा परिसर आहे. त्यामुळे अवजड वाहनांची वर्दळ कायम असते. मात्र, बस व मालमोटारीचा वेग कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पालकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. अपघातात बस व मालमोटारीचे मोठे नुकसान झाले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 students injured in bus car accident near pachoryan jalgaon amy
Show comments