गुन्हेगारांची ओळख परेड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिक : शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन मंगळवारी रात्री शहर पोलिसांनी सर्व ठाण्यांच्या हद्दीत ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून घरफोडी, चोरी, हाणामारी असे गुन्हे दाखल असलेल्या एकूण १५९ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. काही गुन्हेगारांचा उकल न झालेल्या गुन्ह्य़ात सहभाग असल्याचेही या कारवाईतून निष्पन्न झाले. त्यांना अटक करण्यात आली. तसेच या गुन्हेगारांची एकत्रित ओळख परेड घेण्यात आली. सर्व ठाण्यांच्या गुन्हे शोधपथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांची ओळख करून देत त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्य़ांची माहिती देण्यात आली.

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मंगळवारी रात्री ११ वाजता सर्व पोलीस उपायुक्त, साहाय्यक पोलीस आयुक्त तसेच सर्व ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक-दोन, मध्यवर्ती गुन्हे शाखेतील प्रभारी अधिकारी यांना तत्काळ रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले. खुद्द आयुक्त डॉ. सिंगल हे देखील या मोहिमेत सहभागी झाले. उपायुक्त विजयकुमार मगर, उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे आणि लक्ष्मीकांत पाटील, सर्व साहाय्यक पोलीस आयुक्त आणि सर्व ठाण्यांचे अधिकारी, गुन्हे शोधपथकातील कर्मचारी सहभागी झाले होते.

उघडकीस न आलेल्या गुन्ह्य़ांशी त्यांचा संबंध आहे काय, याची सखोल चौकशी करण्यात आली. गुन्हेगारांच्या सध्याच्या हालचाली, कामकाजाबाबत माहिती घेऊन त्यांचा अभिलेख छायाचित्रासह अद्ययावत करण्यात आला. सर्व ठाण्यांमध्ये युद्धपातळीवर ही मोहीम राबविली गेली. गुन्हेगारांचे अभिलेख अद्ययावतीकरण झाल्यामुळे भविष्यात त्यांचा शोध घेणे सोयीस्कर होईल. कोम्ब्िंाग ऑपरेशनदरम्यान मिळून आलेल्या काही गुन्हेगारांचा गुन्ह्य़ात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली.

आक्षेप खोडण्याची धडपड

गुन्हेगारी घटना वाढत असताना पोलीस यंत्रणा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात गर्क असल्याचा आक्षेप काही जागरूक नागरिक नोंदवितात. गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्नच होत नसल्याच्या तक्रारीही केल्या जातात. या परिस्थितीत शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री संपूर्ण शहरात गुन्हेगारांची शोध मोहीम राबवत धरपकड केली. ही कारवाई एका दिवसापुरतीच मर्यादित ठेवू नये. सातत्याने या मोहिमा राबवल्यास पोलिसांचा वचक निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.