लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : शहरातील गुरुदेवनगर भागातील गोदामातून राज्यात बंदी असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूसह दोन वाहने व रोकड मिळून सुमारे १९ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन संशयिताला अटक करण्यात आली. एक जण फरार आहे. विशेष पोलीस महासंचालकांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई

आणखी वाचा-जळगावात सराफ बाजाराला झळाळी, सोन्याची मागील वर्षापेक्षा २५ टक्के अधिक विक्री

भगवान पाटील (३०, आव्हाणी, धरणगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील गुरुदेवनगर भागातील गोदामात गुटखा साठवून ठेवण्यासह त्याची विक्री केली जात असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाला मिळाली. त्याअनुषंगाने पथकाने गोदामात छापा टाकला. तेथे राज्यात बंदी असलेल्या विविध प्रकारचे पानमसाले, जर्दा तंबाखू, गुटखा, सुगंधित तंबाखू, असा सुमारे नऊ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा साठा, नऊ लाखांची दोन वाहने, २३ हजारांची रोकड, असा १९ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पथकाने तो जप्त केला. याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकातील हवालदार रवींद्र पाडवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader