दोन विषयांत नापास झाल्याने येथील जवाहर नर्सिंग प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने विष घेऊन आत्महत्या केली. धुळे तालुक्यातील आर्वी येथे ही घटना घडली. या घटनेची नोंद धुळे तालुका पोलिसांनी केली आहे. सोनाली वाघ (१९, रा. हट्टी इंदवे, साक्री) असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती शिक्षणासाठी तिच्या मावशीकडे आर्वी येथे राहत होती.

हेही वाचा >>> गोंदिया : शालेय पोषण आहाराची अफरातफर! अंगणवाडीच्या शेजारील वाडीत सापडली मिरची पावडरची पाकिटे

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
Arjun Kapoor confirming breakup with Malaika Arora and told about importance of emotional freedom
मलायका अरोराबरोबर ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने सांगितले, भावनिक स्वातंत्र्य का महत्त्वाचे? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला

जवाहर वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकेचे प्रशिक्षण घेत असताना सोनाली दोन विषयांत नापास झाली. यामुळे मानसिक तणाव आल्याने तिने १५ ऑक्टोबर रोजी दुपारी आर्वी येथे राहत्या घरात विषारी द्रव प्राशन केले. यामुळे तिला त्रास सुरू झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी विषारी द्रव प्राशन का केले, असे तिला विचारण्यात आले असता, परीक्षेत दोन विषयात नापास झाले, त्या मानसिक तणावातून विष प्राशन केल्याचे तिने नातेवाईकांना सांगितले होते, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. १७ ऑक्टोबर रोजी सोनालीची प्रकृती अधिकच खालावली. डॉ. शुभम गेडाम यांनी तिला मृत घोषित केले.