नाशिक – यवतमाळ जिल्ह्यातील शाळेची सहल आली असता शिक्षकांसह २० विद्यार्थ्यांचे भ्रमणध्वनी गोदाघाटावरील संत गाडगे महाराज धर्मशाळेतून चोरणाऱ्यास भद्रकाली पोलिसांनी अटक केली. चोराकडून एक लाख ५० हजार रुपयांचे भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ येथील नारायण लीला इंग्लिश मीडियम शाळेचे शिक्षक व विद्यार्थी असे ९४ जण शहरात सहलीसाठी आले होते. शहरातील मंदिरांमध्ये दर्शन घेतल्यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक गोदाघाट येथील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळेत मुक्कामी थांबले. सर्वांनी आपले भ्रमणध्वनी हे चार्जिंगसाठी लावले होते. धर्मशाळेच्या उघड्या खिडकीतून चोरट्याने एक लाख ६० हजार रुपयांचे २० भ्रमणध्वनी चोरले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – नाशिक: राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राला तीन पुरस्कार

हेही वाचा – नाशिक : गुन्हे अन्वेषण प्रशिक्षणात रस्ता सुरक्षेचा समावेश

भद्रकाली पोलीस चोरीचा तपास करत असताना सागर निकुंभ हा चोरटा द्वारका चौक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतले असता सराईत भ्रमणध्वनी चोरटा शफिक शेख (३६, रा. मालेगाव) याच्या मदतीने चोरी केल्याचे त्याने सांगितले. संशयित सागरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १८ भ्रमणध्वनी जप्त केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 mobile phones stolen from teachers and students who came for a trip to nashik 18 mobile phones seized from the suspect ssb
Show comments