धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावरील नरडाणा (ता.शिंदखेडा) शिवारात शुक्रवारी सकाळी पुणे – गोरखपूर ही खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस उलटली. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती घेऊन युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे-शिरपूर दरम्यान नरडाणा (ता.शिंदखेडा) शिवारातील जुन्या टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. अपघातातील जखमींची रुग्णालयात रवानगी करण्यासाठी तातडीने नरडाणा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. जखमी प्रवाशांना धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
First published on: 13-10-2023 at 10:59 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 passengers injured in a pune gorakhpur private bus accident in shindkheda taluka dhule dvr