नाशिक – दीपावलीनिमित्त महापालिकेने कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये तर, शासन अनुदानातून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मनपातील सुमारे साडेचार हजार तर शासन अनुदानातून कंत्राटी तत्वावर नेमलेल्या सुमारे ५२५ कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर एकूण साडेनऊ कोटींचा भार पडणार आहे.

सानुग्रह अनुदानात गतवर्षीच्या तुलनेत तीन हजार रुपयांनी वाढ झाल्यामुळे प्रशासकीय राजवटीत मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. मनपा कर्मचाऱ्यांना २५ ते ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी विविध कर्मचारी संघटनांनी केली होती. या संघटनांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी उपरोक्त निर्णय घेतला. २०२२-२३ मध्ये दिवाळीनिमित्त १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले गेले होते. मागील वर्षी म्हणजे २०२३-२४ मध्ये त्यात साधारणत: ११.३३ टक्के वाढ करून मागील वर्षी १७ हजार रुपये देण्यात आले होते. यामध्ये २०२४-२५ या चालू वर्षी १७.५ टक्के एवढी भरीव वाढ (तीन हजार रुपये) करून हे सानुग्रह अनुदान २० हजार रुपये करण्यात आले आहे. शासन अनुदानातून वेतन घेणाऱ्या आरोग्य, शिक्षणसह अन्य विभागात नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता
Ramshej Fort Conservation, Shivkarya Gadkot Sanstha Campaign, Ramshej Fort,
नाशिक : रामशेज किल्ला संवर्धनार्थ अशी ही धडपड, शिवकार्य गडकोट संस्थेची श्रमदान मोहीम
sharad pawar elected guest president for 98 akhil bharatiya marathi sahitya sammelan
शरद पवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष… हे पद किती महत्त्वाचे?

हेही वाचा >>>त्रिंबक मध्ये केरळच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांविरुद्ध स्थानिकांचा रोष

महापालिकेच्या सातव्या वेतन आयोगानुसार ए १७ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळणार आहे. साधारणत: साडेचार हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे. तसेच शासन अनुदानातून आरोग्य, शिक्षण व अन्य विभागात नेमलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५२५ इतकी आहे. संबंधितांना प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाईल, असे मनपाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरुट यांनी सांगितले.

Story img Loader