नाशिकरोड भारत प्रतिभृती मुद्रणालय आणि चलार्थपत्र मुद्रणालयात मयत कामगारांच्या वारसांना पुन्हा एकदा नौकरी मिळाली आहे. यावेळी २१ वारसांना योजनेचा लाभ झाला. बंद असलेली मयत कामगारांच्या वारसांची भरती आयएसपी मजदूर संघाच्या पाठपुराव्यातून सुरू झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही मुद्रणालयात एकूण ७६ मयत कामगारांच्या वारसांना सेवेत घेण्यात आले आहे. याबाबतची माहिती मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> औषध फवारणी करताना विषबाधेमुळे शेतकऱ्याचा मृत्यू; धुळे जिल्ह्यातील घटना

नवीन मनुष्यबळ निकषानुसार डब्लू वन ग्रेडच्या पाच टक्के जागा भरण्याची पध्दत कशी चुकीची आहे, हे मजदूर संघाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. प्रशासनाशी चर्चा करून त्यावर निर्णय घेण्याची मागणी केली होती. या मागणीला यश मिळाले आहे. नवी दिल्लीतील प्रेस महामंडळाचे संयुक्त महाव्यवस्थापक (मनुष्यबळ) प्रकाश कुमार यांच्या स्वाक्षरीचे भरतीचे पत्र मजदूर संघाला नुकतेच प्राप्त झाले. त्यामुळे २१ मयत कामगारांच्या वारसांना कामावर घेण्याचा मार्ग मोकळा झाला. या मंजुरीमुळे आतापर्यंत एकूण ७६ वारसांना मुद्रणालयात नोकरी देण्याचे काम मजदूर संघाने केले आहे. उर्वरित वारसांसाठीही मार्ग निघावा यासाठी प्रयत्न सुरु आहे. वेळप्रसंगी संघर्ष करावा लागला तर तोही केला जाईल, असे गोडसे यांनी सूचित केले. दरम्यान, या वारसांतर्फे जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, राजू जगताप, अशोक पेखळे आदी उपस्थित होते.