१५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान आयोजन

नाशिक : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ५८ व्या राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी नाशिक येथे १५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. दररोज सायंकाळी सात वाजता परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात स्पर्धेतील नाटके होणार असून नाशिक शहरातील २२ संघांनी सहभाग घेतला आहे.

प्राथमिक फेरीतील नाटकांच्या वेळापत्रकानुसार पहिल्या दिवशी अंबिका चौक सामाजिक, शैक्षणिक, कला आणि सांस्कृतिक सेवाभावी संस्थेच्या वतीने श्याम मनोहर लिखित ‘प्रियंका आणि दोन चोर’ नाटक सादर होईल. दुसऱ्या दिवशी बॉश फाईन आर्ट्सच्या वतीने मुकुंद कुलकर्णी लिखित ‘आधारशिला’, १७  रोजी दीपक मंडळ, सांस्कृतिक विभागाच्या वतीने वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’, १८ रोजी एच.ए.ई.डब्ल्यू.आर.सी. रंगशाखा ओझरच्या वतीने रवींद्र बेंद्रे लिखित ‘भय इथले संपत नाही’, १९ रोजी जागृती सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास संस्थेच्या वतीने सुधाकर गाढवे लिखित ‘द परफेक्ट मर्डर’, २० रोजी कलाकुंभ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पराग घोंगे लिखित ‘ॠतु आठवणींचे’, २१ रोजी लोकहितवादी मंडळाच्या वतीने नीलेश घोरपडे लिखित ‘कळसूत्री’, २२ रोजी ल्युमिनस फाऊंडेशनच्या वतीने विवेकानंद भट लिखित ‘प्रारब्ध’, २३ रोजी नम्रता कलाविष्कार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देवेन कापडणीस लिखित ‘देहासक्त’, २४ रोजी ओम साई श्री सच्चिदानंद सामाजिक संस्थेच्या वतीने सोनाली कुलकर्णी-गायकवाड लिखित ‘अश्वमेध’, २५ रोजी आर. एम. ग्रुपच्या वतीने राजेंद्र पोळ लिखित ‘एक होता बांबु काका’, २६ रोजी एस. एम. रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने गिरीश कर्नाड लिखित ‘नागमंडल’, २७ रोजी संस्कृतीच्या वतीने सुरेश राघव लिखित ‘तिरथ में तो पानी है’, २८ रोजी संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने चेतन दातार लिखित ‘खेळ मांडियेला’, २९ रोजी श्री शिवछत्रपती सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाच्या वतीने प्रसन्न काटे लिखित ‘लास्ट सीन’, ३० रोजी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या वतीने विजय साळवी लिखित ‘डार्लिग’ नाटक होईल.

स्पर्धेचा समारोप ‘डोंगरार्त’ नाटकाने

२ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता सुरभी थिएटरच्या वतीने राजेश वर्मा लिखित ‘आनंद ओवरी’, सायंकाळी सात वाजता सूर्या शैक्षणिक सामाजिक युवा कला क्रीडा संस्थेच्या वतीने रमेश मंत्री लिखित ‘पती, पत्नी व प्रियकर’, ३ डिसेंबर रोजी विजय नाटय़ मंडळाच्या वतीने नेताजी भोईर लिखित ‘व्हईल ते दणक्यातच’, ४ डिसेंबर रोजी विजय शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या वतीने सुधीर कुलकर्णी लिखित ‘अखेरचं बेट’, ५ डिसेंबर रोजी विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या वतीने दत्ता पाटील लिखित ‘विसर्जन’, तर शेवटच्या दिवशी ६ डिसेंबर रोजी झेप सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने अपर्णा क्षेमकल्याणी लिखित ‘डोंगरार्त’ नाटक सादर होणार आहे. नाटय़प्रेमींनी प्राथमिक फेरीतील नाटकांचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Story img Loader