जळगाव – जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, अखेरच्या दिवसापर्यंत २३७४ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.  जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांसह आजी-माजी खासदारांसह आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  जळगाव बाजार समितीच्या १८ जागांसाठी शेवटच्या दिवशी १६३ इच्छुकांनी अर्ज दाखल केले. एकूण २६८ अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी अर्जांची छाननी होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उपाययोजना न करता अवजड वाहतूक बंद करण्यास विरोध ; आंदोलनाचा वाहतूकदार संघटनेचा इशारा

सहा ते २० एप्रिल हा कालावधी अर्ज माघारीसाठी आहे. बाजार समित्यांसाठी तालुकानिहाय दाखल उमेदवारी अर्ज – जामनेर- २२४, यावल- १४४, चाळीसगाव-२१५, अमळनेर-१८७, जळगाव- २६८, पारोळा- १६०, पाचोरा-भडगाव-२३४, बोदवड- १८६, रावेर- १५३, धरणगाव-२३४, भुसावळ- ८०, चोपडा- २८९ याप्रमाणे संख्या आहे. बहुतेक समित्यांमध्ये महाविकास आघाडी विरुध्द शिवसेना-भाजप अशी लढत होण्याची शक्यता आहे. भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही यानिमित्ताने आपली ताकद दाखविण्याची संधी आहे

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2374 aspirants applications for election of 12 market committees in jalgaon district zws
Show comments