मेच्या प्रारंभी उकाडय़ाची तीव्रता वाढली असताना जिल्ह्य़ातील २४ मोठय़ा व मध्यम प्रकल्पात १६ हजार २४७ दशलक्ष घनफूट म्हणजे २५ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच काळात जलसाठय़ाचे हे प्रमाण केवळ सात टक्के इतके होते. धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा असल्याने गतवर्षीच्या तुलनेत टँकरची संख्याही लक्षणीय कमी झाली आहे. यंदा जिल्ह्य़ात केवळ ३७ गावे व ३६ वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मागील काही वर्षांत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. समाधानकारक पावसामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या या वर्षी अतिशय कमी झाली आहे. धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा असल्याने मनमाड, येवला असे काही अपवाद वगळता पाणीकपातीची वेळ आलेली नाही. टळटळीत उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगात होत आहे. गतवर्षी दुष्काळात जिल्ह्य़ातील आठ धरणे कोरडीठाक पडली होती. यंदा केवळ तीन धरणे रिक्त झाली आहेत. उर्वरित २१ धरणांमध्ये सध्या २५ टक्के जलसाठा आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २०८४ दशलक्ष घनफूट (३७) टक्के जलसाठा आहे. काश्यपी धरणात १५७४ (८५), गौतमी गोदावरी १०८ (६) असा गंगापूर धरण समूहात एकूण ३८ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षीसारखे शहरवासीयांना पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागले नाही. पालखेड ३७८ (५८), करंजवण ३८४ (७), वाघाड ८५ (४), ओझरखेड ३३४ (१६), तीसगाव ४८ (११), दारणा २२५९ (३२), भावली १३७ (१०), मुकणे ९९३ (१४), वालदेवी १४७ (१३), कडवा ३२६ (१९), चणकापूर १००१ (४१), हरणबारी ३४९ (३०), केळझर ३७ (३०), गिरणा ४६९३ (२६), पुनद ९२१ (७१) असा जलसाठा असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्य़ातील नांदुरमध्यमेश्वर, नागासाक्या व माणिकपुंज हे तीन धरण कोरडेठाक पडली आहेत. पुणेगाव, भोजापूर या धरणांत जेमतेम १-२ टक्के पाणी असल्याने त्यांची वाटचाल त्या दिशेने सुरू आहे.

वाढत्या तापमानाने धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. परिणामी जलसाठा कमी होण्यास हातभार लागत आहे. गेल्या वर्षी मेच्या प्रारंभी धरणांमध्ये ४४३२ दशलक्ष घनफूट (७ टक्के) जलसाठा होता. यंदा त्या तुलनेत २१ टक्के जलसाठा अधिक असल्याने टंचाईच्या झळा कमी आहेत.

२६ टँकरने पाणीपुरवठा

दरवर्षी डिसेंबरपासून अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. एप्रिल व मे महिन्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या शेकडोंच्या घरात पोहोचते. यंदा मात्र तशी स्थिती नाही. टंचाई शाखेने दिलेल्या माहितीनुसार सध्या ३७ गावे व ३६ वाडय़ांना २६ शासकीय टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकरने पाणी द्यावे लागलेल्या गावांची संख्या ७५ टक्क्यांनी कमी आहे. शहरी भागात टंचाई जाणवत नसली तरी काही भागांत पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. मनमाड शहरात पालखेडच्या आवर्तनाचे पाणी पोहोचले आहे. गतवर्षी मनमाडमध्ये दुष्काळामुळे गंभीर स्थितीला तोंड द्यावे लागले होते. यंदा दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.