जळगाव – जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात दोनगावजवळ चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव बस खड्ड्यात गेल्याने विद्यार्थ्यांसह एकूण २८ प्रवासी जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी घडला. सर्व जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लाडली येथून रेलमार्गे जळगावकडे बस येत असताना दोनगावजवळील वळणावर चालक अशोक पाटील यांचा ताबा सुटला. अनियंत्रित झालेली बस काही कळण्याच्या आत इलेक्ट्रिक खांबाला धडकली. खांब जर नसता तर बस थेट नाल्यात जाऊन पडली असती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दोनगाव, लाडली, रेल गावातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा >>>टाकेहर्षची पाण्यासाठी वणवण, हंडा मोर्चाचा इशारा
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये मयुरी पाटील (१४), आधार सोनवणे (४५), लावण्या सोनवणे (११), सायली पाटील (१५), हर्षा पाटील ( १३), गुंजन सपकाळे (१६), जनाबाई पाटील (५५), अजय पाटील (१३), कुंदन पवार (१३), सुनीता भील (४६), काजल पाटील (१५), मोहिनी पाटील (१७), भावना पाटील (१६), अशोक पाटील (५७), वालात्री शिरसाट (५३), कुणाल गुंजाळ (१३), रेखा दांडेकर (२५), जिजाबाई पाटील (६२), पंढरीनाथ पाटील (६७), जगन पवार (४२), विश्वनाथ पाटील (७१), निखिल पाटील (२३), तन्मय पाटील (१९), गुंजन पाटील (१४), विवेक पाटील (१७), राम अवचिते (१३), जयेश पाटील (१६), सायली पाटील (१७) यांचा समावेश आहे.