धुळे – सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांचा उत्साह असताना धुळे शहरालगत असलेल्या चितोड गावात गणपती विसर्जन मिरवणुकीतील ट्रॅक्टरखाली सापडल्याने तीन बालकांचा मृत्यू झाला. सहा जण जखमी झाले. या अपघातामुळे गावात गोंधळ उडाला. जखमींना त्वरीत धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. धुळे तालुक्यातील चितोड गावात एकलव्य गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना हा अपघात घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> Ganesh Visarjan Procession : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ

मिरवणूक उत्साहात सुरु असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिरवणुकीत असलेला ट्रॅक्टर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या गर्दीत शिरला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रत्येक जण आपला जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करु लागला. काही बालकांना कळण्याच्या आत ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर गेला. या अपघातात परी बागूल (१३), शेरा सोनवणे (सहा वर्षे) आणि लड्डू पावरा (तीन वर्षे) या बालकांचा मृत्यू झाला. या अपघातात गायत्री पवार (२५), विद्या जाधव (२७), अजय सोमवंशी (२३), उज्वला मालचे (२३), ललिता मोरे (१६), रिया सोनवणे (१७) हे जखमी झाले. मृत आणि जखमी सर्व चितोड येथील रहिवासी आहेत.