नाशिक: गुजरातमधील बारडोली शहराजवळ शुक्रवारी पहाटे मालमोटर अपघातात नाशिकच्या बागलाण तालुक्यातील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण जखमी आहेत. डाळिंब छाटणी करण्यासाठी बागलाण तालुक्यातील खमताणे परिसरातील छाटणी कामगार भाजीपाला वाहतूक करणाऱ्या मालमोटारीने सुरतकडे निघाले होते. बारडोलीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालमोटार उलटली. या अपघातात पिंटू पवार (४०), सोनू मोरे (३५), भाऊसाहेब बागूल (५०, तिघेही खमताणे) यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : नाशिक: लाच स्वीकारताना पोलीस नाईक जाळ्यात

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

बाबाजी पवार, भाऊसाहेब पवार, आकाश माळी, तुळशीराम सोनवणे ( रा.तळवाडे, बागलाण), दादा केरसानेकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती घटनास्थळावर उपस्थित बागलाणमधील एका चालकाने आमदार दिलीप बोरसे यांना देत मदतीची मागणी केली. बोरसे यांनी बारडोलीचे आमदार ईश्वरभाई परमार यांच्याशी संपर्क साधून अपघातग्रस्तांना मदतीची विनंती केली. त्यानंतर परमार यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून जखमींना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.