लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: जिल्ह्यात ठिकठिकाणी सायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने या सायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत संशयिताकडून ३१ सायकली हस्तगत केल्या.

शहरातील खासगी शिकवणी वर्ग, शाळा- महाविद्यालयांसह ठिकठिकाणी सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. शिव कॉलनी परिसरातील गणेश पार्कमधील गिरीश खैरकर (२२ याची सायकल २१ डिसेंबर २०२२ रोजी चोरीला गेली होती. यांसह इतरही गुन्हे दाखल होते. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांना या सायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने निरीक्षक पाटील यांनी तपासासाठी पथक नियुक्त केले.

आणखी वाचा- अंतर्धान मतदार अन् दूरवरील मैदानाजवळील मतदान केंद्र- मनमाड बाजार समिती निवडणूक

पोलिसांकडून संशयितांचा शोध घेणे सुरू असताना, पथकाला जयेश राजपूत (१९, मयूर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) याच्याकडे बऱ्याच सायकली असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आपला खाक्या दाखविताच जयेशने सायकल चोरींची कबुली दिली. त्याने लपवून ठेवलेल्या ३१ सायकली हस्तगत करण्यात आल्या. ज्या नागरिकांची सायकल चोरीस गेली आहे, त्यांनी रामानंदनगर पोलिसांशी लगेच संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 31 bicycles seized from thief in jalgaon mrj
Show comments