जळगाव – महापालिका प्रशासनातर्फे मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, तीन वर्षांत ३५ हजार ८१० मालमत्ताधारकांनी ३९ कोटी ८० लाखांचा ऑनलाइन भरणा केला आहे. पुढील आर्थिक वर्षात महापालिकेतर्फे प्रत्येक मालमत्तेवर ऑनलाईन करभरणा करणे सुलभ व्हावे यासाठी क्यूआर कोड लावण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिका प्रशासनातर्फे अभय दंड माफी योजनेचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आला आहे. त्यानंतर उर्वरित थकबाकीदारांच्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केली जाणार आहे.

हेही वाचा – नाशिक : विविध मागण्यांसाठी वैद्यकीय प्रतिनिधींचा संप

मालमत्ता करधारकांचा ऑनलाइन भरणा दरवर्षी वाढत आहे. २०२१-२२ मध्ये १२ हजार ११० मालमत्ताधारकांनी ११ कोटी ६० लाख रुपये, २०२२-२३ मध्ये १३ हजार ३०० जणांनी १७ कोटी ५० लाख रुपये, तर २०२३-२४ मध्ये आतापर्यंत १० हजार ४०० मालमत्ताधारकांनी १० कोटी ७० लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत ऑनलाइन जमा केले आहेत. अजून आर्थिक वर्ष संपण्यासाठी साडेतीन महिने बाकी असून, यावर्षी १५ हजार मालमत्ताधारक आणि एकूण २० कोटींपर्यंत ऑनलाइन करभरणा होण्याचा अंदाज आहे. जळगावकर आता महापालिकेच्या संकेतस्थळावरूनही मालमत्ता कराचा ऑनलाइन भरणा करू शकणार आहेत. तसेच मालमत्ताधारकांना किती रक्कम अभय दंड योजनेत माफ होऊ शकते, याचेही भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठविले जात आहेत. पुढील आर्थिक वर्षात महापालिका प्रशासनातर्फे प्रत्येक मालमत्तेवर ऑनलाइन करभरणा करणे सुलभ व्हावे यासाठी क्यूआर कोड लावण्यात येणार आहे.

हेही वाचा – नाशिकमध्ये आता घरांच्या किंमतींची पाच कोटींपर्यंत मजल; गुरुवारपासून ‘होमेथॉन २०२३’ प्रदर्शन

थकीत मालमत्ता करधारकांनी अद्याप कराचा भरणा केलेला नसेल, अशा मिळकतींचा जाहीर लिलाव जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मिळकतधारकांनी कराचा भरणा करून अभय दंड माफी योजनेचा लाभ घ्यावा. – डॉ. विद्या गायकवाड (आयुक्त तथा प्रशासक, महापालिका, जळगाव)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 39 crores accumulated in jalgaon mnc treasury due to online tax payment in three years ssb
Show comments