शाळेतून आईसोबत घरी निघालेल्या चारवर्षीय बालिकेला भरधाव डंपरने उडविल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच जखमी बालिकेचा मृत्यू झाला. प्रेरणा योगेश नेमाडे (४, रा. माउलीनगर, जळगाव) असे मृत बालिकेचे नाव आहे. योगेश नेमाडे हे पत्नी दक्षता, मुलगी प्रेरणा व मुलासह माउलीनगर भागात वास्तव्याला आहेत. त्यांची मुलगी प्रेरणा ही जळगाव पब्लिक स्कूलमध्ये नर्सरीत शिकत होती. रोजप्रमाणे सकाळी प्रेरणा शाळेत गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> शहापूर जवळील आटगाव येथे शालेय वाहनाच्या धडकेत चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू

शाळा सुटल्यानंतर तिची आई  दुचाकीने प्रेरणाला घरी जाण्यासाठी निघाल्या. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तनयनजीक भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीसह दक्षता व त्यांची मुलगी प्रेरणा दोघीही रस्त्यावर कोसळल्या. त्यात प्रेरणा ही गंभीर जखमी झाली. तिला त्वरित जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी तिला मृत घोषित केले. चालक डंपर सोडून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.