नाशिकमधील देवळा तालुक्यातील उमराणेजवळ महामार्गावर मंगळवारी सकाळी बस आणि मालमोटार यांच्यात धडक होऊन ४० प्रवासी जखमी झाले. यातील आठ जण गंभीर असल्याने त्यांना मालेगांव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी नऊ वाजता मुंबई-आग्रा महामार्गावरील उमराणेनजीकच्या सांगवी येथे गतिरोधकाजवळ भरधाव नाशिक- चाळीसगांव बसची समोरुन येणाऱ्या मालमोटारीला धडक बसली. या अपघातात बसमधील ४० प्रवासी जखमी झाले. यातील आठ प्रवासी गंभीर जखमी असल्याने त्यांना मालेगांव येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये वाहन चालक जितू पवार, वाहक योगेश राठोड, नामदेव आहेर, विजय पवार (दिंडोरी), विजया खाडे, पुरुषोत्तम खाडे, सुभाष बोरसे, प्रदीप पाटील, प्रशांत बोरसे, आशा पवार, श्याम विसपुते, कमल साळुंखे, आप्पा मोरे, भालचंद्र चिंचोळे, विजय पवार, मंगला चिंचोले ( सर्व रा.नाशिक) आदींचा समावेश आहे .या सर्व जखमींना उमराणे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उमराणे येथील जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, उमराणाचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत देवरे, माजी सभापती विलास देवरे यांनी धाव घेत कृषी उत्पन्न बाजार समिती आणि टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना मालेगाव, उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयात हलविल. देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- कायद्यानुसार सत्यजित तांबे यांना अपक्षच राहावे लागणार
अपघाताची मालिका सुरूच
मागील दोन-तीन महिन्यांपासून जिल्ह्यात बससेवेला अपघात होण्याच्या अनेक घटना घडल्या. पंचवटीत औरंगाबाद रस्त्यावरर यवतमाळ येथील खासगी बस अपघातग्रस्त झाल्यानंतर पेटल्यान १३ हून अधिक प्रवाश्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सप्तश्रृंग गडावर जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस पेटली. यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. सिन्नरजवळ शिवशाही बसने पेट घेतल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरुप उतरविण्यात आले. त्यानंतर बस खाक झाली. अशा घटना घडल्या आहेत.