नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षीमित्रांची हजेरी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाशिककर गोठवून टाकणाऱ्या थंडीचा अनुभव घेत असताना हे बदलते वातावरण स्थलांतरित पक्ष्यांसाठी पोषक ठरत आहे. निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्ष्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून सद्य:स्थितीत ४० हजारांहून अधिक पक्षी या ठिकाणी मुक्कामास आले आहेत. ही संख्या पुढील काळात वाढेल, असा अंदाज पक्षीमित्रांनी व्यक्त केला आहे. या पाहुण्या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी सध्या पक्षीमित्र अभयारण्यात हजेरी लावत आहेत.
महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात दिवाळीनंतर गुलाबी थंडी पडण्यास सुरुवात झाली की देश-विदेशातील पक्षी मुक्कामास येण्यास सुरुवात करतात. अभयारण्याची भौगोलिक रचना, पाणथळ जमीन यामुळे दिवसागणिक या ठिकाणी स्थलांतरित पक्षी येण्याचे प्रमाण वाढत आहे. यंदा थंडीची तीव्रता मागील वर्षांच्या तुलनेत जास्त आहे. काही दिवसांपासून निफाडचा पारा पाच ते एक अंशादरम्यान रेंगाळत आहे. थंडीच्या तडाख्याने द्राक्षबागा वाचविण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. नागरिकांनाही आरोग्यविषयक तक्रारी भेडसावू लागल्या आहेत. या थंड वातावरणातही नांदुरमध्यमेश्वर परिसरात पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या देश- विदेशातील २४० पेक्षा अधिक जातीचे पक्षी या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. तसेच २४ जातींचे मासे आणि ४०० पेक्षा जास्त वनस्पतीही या अभयारण्यात आहेत. अभयारण्यातील ११ पक्षी निरीक्षण मचाणांवरून केलेल्या पक्षी गणनेत ४० हजार पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये यंदा हिवाळ्यात हजारो गुलाबी मैनांचे, तर रोहितची संख्या शंभरच्या घरात गेली आहे. कॉमन क्रेन या तीन फुटाच्या पक्ष्यांची संख्या अडीच हजारापर्यंत गेली आहे. पक्षी गणनेत चमचा, वारकरी, उघडय़ा चोचीचा करकोचा, राखी बगळा, गडवाल, युरेशियान, विजन, जांभळी पानकोंबडी, पोचार्ड, रंगीत करकोचा आदींसह गवतावर राहणारे गप्पीदास, वेडा राघु, मुनिया, डव, हुदहुद, पिपीट, बुलबुल, नीलकंठ, दयाळ, नाचण आदी पक्ष्यांबरोबर ओस्प्रे, मार्श हेरिअर हे शिकारी पक्षी पाहायला मिळत आहेत.
काही दिवसांत थंडी वाढल्याने काही अंशी परिणाम पक्ष्यांच्या जीवनमानावर दिसून येत आहे. काही पक्ष्यांना सूर्यप्रकाश गरजेचा असल्याने त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. राखी बगळा थंडीमुळे दोन-तीन दिवस एकाच जागी असल्याचे निरीक्षण पक्षीमित्र प्रा. आनंद बोरा यांनी नोंदविले.
पक्ष्यांना थंडी वाजते का?
पक्ष्यांना अधिक थंडी सहन होत नाही म्हणून ते स्थलांतर करून हजारो किलोमीटर प्रवास करून येतात. शारीरिक रचनेतील बदलामुळे ते काही प्रमाणात थंडीला तोंड देऊ शकतात. वर्षभर पाण्याशी संपर्क येत असल्याने त्यांना ते शक्य असावे. शून्य अंशाखाली तापमान गेल्यावर त्यांनादेखील थंडीचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळे पक्ष्यांनाही ऊर्जा मिळणे आवश्यक आहे. सूर्यकिरणे ‘सनबाथ’ मिळाल्याशिवाय पक्षी आकाशात उड्डाण करीत नाहीत.