नाशिक – कळवण तालुक्यातील बेज शिवारात पोल्ट्री फार्मच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकल्याने ४०० पक्ष्यांचा (कोंबड्या) मृत्यू झाला असून, हे पाणी पिलेले उर्वरित पक्षी अत्यवस्थ अवस्थेत आहेत. शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कळवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – सत्यशोधक महिला परिषदेत वन कायदा रद्द करण्याचा ठराव
कळवण तालुक्यातील नवीबेज शिवारात हा प्रकार घडला. शेतकरी सचिन रौंदळ यांचा या ठिकाणी पोल्ट्री फार्म आहे. फार्ममधील पाण्याच्या टाकीत रात्री कुणीतरी विषारी औषध टाकल्याने सुमारे पाच हजार पक्ष्यांना विषबाधा झाल्याचे सांगितले जाते. त्यापैकी ४०० पक्षी मयत झाले असून एक लाखाचे नुकसान झाले. रौंदळ हे शेतीच्या जोडीला कुक्कुटपालन व्यवसाय करतात. २००५ पासून करार पद्धतीने त्यांनी मानस नावाने दोन पोल्ट्री फार्म टाकले आहेत. सध्या तिथे एका खासगी कंपनीकडून घेतलेल्या ४८८० पक्ष्यांचे पालन पोषण केले जात होते. रात्रीच्या वेळी पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकल्याने ४०० पक्ष्यांचा मृत्यू झाला. सेकंदाला एक कोंबडी मयत होत आहे. उर्वरित पक्षी चिंताजनक अवस्थेत असून त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याने तेही मृत होण्याची शक्यता व्यक्त आहे.