लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्या अंतर्गत ४०० किलो प्लास्टिक व तत्सम कचरा संकलित करण्यात आला.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे नियोजन करण्यात आले. त्यात पंचवटी विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे आदींच्या उपस्थितीत पंचवटीतील कन्नमवार पूल ते लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंत गोदावरी पात्रालगत विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात ४०० किलो प्लास्टिक आणि तत्सम कचरा गोळा करून घंटागाडीमार्फत उचलण्यात आला. मलेरिया विभागामार्फत नदी पात्रातील पाणवेलीही काढण्यात आल्या.

हेही वाचा… नाशिक : दामदुप्पट परताव्याचे आमिष; गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा

नदी परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. स्वामी नारायण मंदिरासमोर व्यवसाय करणाऱ्यांना आणि पात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना नदी पात्रात कचरा न टाकता विलगीकरण करुन घंटागाडीत तो देण्याचे आवाहन करण्यात आले. प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये याबाबत जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक उदय वसावे, दीपक चव्हाण, नंदू गवळी, किशोर साळवे, अनिल नेटावटे आदींसह ४५ स्वच्छता कर्मचारी तसेच मलेरिया विभागाचे कैलास पांगारकर आणि इतर कर्मचारींनी सहभाग घेतला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 400 kg garbage collected near godavari shore in nashik dvr