नाशिक – २०२४ या वर्षभरात धुळे जिल्ह्यात ४०८ जणांनी आत्महत्या केल्या. त्यात सर्वाधिक ८२ टक्के पुरुषांचा समावेश असून १३४ जणांनी मानसिक तणावामुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी २०२४ या वर्षात जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय आत्महत्या आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल झालेल्या नोंदींचे विश्लेषण केले.

धुळे जिल्ह्यात झालेल्या ४०८ जणांच्या आत्महत्येच्या पोलीस ठाणेनिहाय नोंदी धुळे शहर ५३, धुळे आणि साक्री विभाग १६४, शिंदखेडा आणि शिरपूर विभाग १९१ याप्रमाणे आहेत. सर्वाधिक ८२ टक्के संख्या पुरुषांची आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये ३३५ पुरुष आणि ७३ स्त्रियांचा समावेश असून विवाहित पुरुषांची २६० तर, स्त्रियांची संख्या ५० आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली २५ गुन्हे दाखल आहेत. १३४ जणांनी मानसिक तणावामुळे, ९० जणांनी व्यसनांमुळे तर, ८५ जणांनी कौटुंबिक कलहातून आत्महत्या केली. या आत्महत्या रोखण्याजोग्या होत्या, असा प्राथमिक निष्कर्षही पोलीस अधिकाऱ्यांनी काढला आहे.

2 killed as auto overturn in khed taluka
मरकळ येथे रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
mahakumbh vip arrangement
Mahakumbh: चेंगराचेंगरीत सामान्य भाविकांचा मृत्यू; दुसरीकडे VIP साठी विशेष व्यवस्था, इन्फ्लूएन्सरच्या व्हिडीओवर संताप
Two children aged 2 and 17 died accidentally in separate incidents in Badlapur Kalyan East
कल्याण, बदलापूरमध्ये दोन बालकांचा अपघाती मृत्यू
Man dies after cousin inserts compressor pipe in private parts
काही सेकंदाची मस्करी जीवावर बेतली; गुदद्वाराजवळ कम्प्रेसर पाईप नेल्याने तरुणाचा मृत्यू
Two people died in accident on Peth road nashik
नाशिक : पेठ रस्त्यावरील अपघातात दोन जणांचा मृत्यू
Suicide kota
Kota Suicide Case : कोटा येथे पुन्हा आत्महत्या सत्र! २४ तासांत दोघांनी संपवलं आयुष्य; महिन्याभरातील सहावी घटना!

हेही वाचा >>> बांधकाम परवानगीचे प्रस्ताव आता ऑनलाईनच

आत्महत्या कशा थांबविता येतील, यासंदर्भात मनोविकारतज्ज्ञ डॉ. जगदीश गिंदोडिया यांनी माहिती दिली. एखादी व्यक्ती तणावग्रस्त आणि उदासीन असल्याचे लक्षात येताच समुपदेशन होणे गरजेचे आहे. यामुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या आपण नक्कीच कमी करू शकतो. आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडतात. विशेषत: महिलांमध्ये उदासीनता आणि निराशपणा मोठ्या प्रमाणात असते. मन मोकळे करण्यासाठी त्यांना जागाच नसते, असे बहुतेक वेळा लक्षात आले आहे. यामुळे त्या मानसिक तणावात राहतात. अशा महिलांचे योग्य समुपदेशन करण्याची गरज डाॅ. गिंदोडिया यांनी मांडली.

हेही वाचा >>> मेळा स्थानकात लूट, कांदा व्यापाऱ्याचे ११ लाख रुपये हिसकावले

मनोविकार जडलेल्या बेवारस महिला आणि पुरुषांवर उपचार आणि पुनर्वसनासाठी  काम करणाऱ्या स्नेहदीप फाउंडेशनच्या संस्थापक, संचालिका भाग्यश्री कुलकर्णी यांनी, मानसिक तणावातून मनोधैर्य खचते आणि मानसिक संतुलनही बिघडत असल्याने अनेकजण अप्रिय घटनांकडे वळतात, असे नमूद केले. मानसिक तणावात असलेले अनेक जण दवाखान्यात उपचार घेणे टाळतात. कुटूंबातील ज्येष्ठ व्यक्तीही त्यांना मनोविकार तज्ज्ञांकडे उपचारासाठी नेत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आत्महत्यांची कारणे

कोणत्या कारणांमुळे किती आत्महत्या झाल्या, याची नोंदही धुळे जिल्हा पोलिसांनी केली आहे. त्यानुसार मानसिक ताण आणि नैराश्य १३४, मद्याचे अतीप्राशन ९०, कौटुंबिक वाद ८५, आजारपण ४२, कर्जबाजारी १८, रागाच्या भरात १७, शेतमाल नुकसान ७, शैक्षणिक नुकसान ६, प्रेमभंग ५, लग्न न जमणे ४ याप्रमाणे वर्षभरात ४०८ जणांनी आत्महत्या केली आहे.

Story img Loader