लोकसत्ता वृत्तविभाग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भुसावळ: भुसावळ तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या मुक्ताई सागर (हतनूर) धरणाच्या म्हणजेच तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने बुध‌वारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत.

आणखी वाचा- जळगाव: रावेर तालुक्यात प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थांचे अर्धशरीर जमिनीत गाडत आंदोलन

धरणाचे अभियंता शशिकांत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने हतनूर धरणातून १३७०९३ क्युसेक एवढा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तापी आणि पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणात येणाऱ्या पाण्यामुळे टप्प्याटप्प्याने धरणातून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो. सद्यस्थितीत धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. धरणात एकूण पाणी साठा १९८ दलघमी तर पाणी पातळी २१० मीटर इतकी आहे, अशी माहिती अभियंता चौधरी यांनी दिली

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 41 gates of hatnoor dam have been fully opened mrj
Show comments