नाशिक : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने सुरू असलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून तीन नियमित फेऱ्या झाल्यानंतरही जिल्ह्यात १२ हजार ९२५ जागा रिक्त आहेत. रिक्त जागांसाठी घेण्यात येणाऱ्या विशेष फेरीसाठी केवळ चार हजार ४८७ अर्ज आले आहेत. नाशिक महानगरपालिका हद्दीत ६० हून अधिक कनिष्ठ महाविद्यालये असून प्रवेश प्रक्रिया आभासी पध्दतीने राबविण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष फेरीअंतर्गत प्रवेशासाठी बॉईज टाऊन कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्यसाठी २४१, विज्ञान ३६१, सर डॉ. मो. स. गोसावी कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य २८१, विज्ञान २९६, लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयात कला ३३४, वाणिज्य २०० आणि विज्ञान शाखेसाठी ३२३, हं.प्रा.ठा. महाविद्यालयात कला ४०५ आणि रा.य.क्ष. महाविद्यालयात विज्ञान ३५७, के. व्ही. एन नाईक महाविद्यालयात कला २८१, वाणिज्य २८२ आणि विज्ञानसाठी २६३, सिडको येथील के.ए.के.डब्ल्यू महाविद्यालयात कला २७८, वाणिज्य ३३३ आणि विज्ञान ३००, के.टी.एच.एम. महाविद्यालयात कला ३२७, वाणिज्य २६६ आणि विज्ञानसाठी ३०० गुणांची आवश्यकता आहे. सोमवारी सकाळी आभासी पध्दतीने यादी जाहीर झाली. २७ जुलै रोजी रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4487 applications for special round eleventh admission process ysh
Show comments