मालेगाव येथे २४ तासांत ६६ नवे रुग्ण
नाशिक : जिल्हा प्रशासनाकडून करोनावर नियंत्रणासाठी ‘साम-दाम-दंड’ या त्रिसूत्रीचा अवलंब होत असतांना टाळेबंदीच्या काळात शहरात घुसखोरी केलेल्या इतर जिल्ह्य़ातील नागरिकांकडून तसेच स्थानिकांनी योग्य ती खबरदारी न बाळगल्याने शहरातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. ही स्थिती जिल्ह्य़ात विशेषत मालेगाव मध्ये कायम असल्याने बुधवापर्यंत जिल्ह्य़ातील करोनाचा आकडा ४७० पर्यंत पोहोचला आहे.
करोना ग्रस्तांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्र, घरीच अलगीकरण, अनावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई अशा वेगवेगळ्या माध्यमातून गर्दीवर पर्यायाने करोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
टाळेबंदी असतांनाही करोनाचे केंद्र असलेल्या पुणे, मुंबई, मालेगाव सह अन्य भागातून शहर परिसरात येणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने वाढत असतांना दुसरीकडे करोनाग्रस्त रुग्णांची संख्याही शहर परिसरात वाढत आहे. सिन्नर येथील मुलगी नाशिक येथे माहेरी आली. या काळात तिचा मुंबई येथील दीर ज्याला घरीच विलगीकरण केले होते तो नाशिक येथे आला. खोटी कागदपत्रे दाखवित आडमार्गाने शहरात बाहेरील नागरीक येत आहेत. परंतु, त्यादृष्टीने स्थानिक नागरीक खबरदारी बाळगत नसल्याने करोनाचा फैलाव वाढत असल्याचे महापालिकेचे प्रमुख अधिकारी डॉ. आवेश पलोड यांनी नमूद केले.
शहर परिसरात मंगळवारी रात्री दोन करोनाबाधित रुग्ण आढळले. यामध्ये एक जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच ७५ वर्षांची वृध्द महिलेचा समावेश आहे.ही महिला माणेकशा नगर परिसरात राहते. या अहवालाच्या आधारे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या पत्नीलाही जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्या घशातील द्रव्याचे नमुने घेण्यात आले आहेत. परंतु, या काळात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पीपीई संचाचा वापर केल्याने त्यांच्यापासून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धोका नव्हता. सर्वानी योग्य ती खबरदारी घेतल्याने केवळ त्यांच्या पत्नीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे करोना कक्षाचे प्रमुख डॉ. अनंत पवार यांनी नमूद केले.
तसेच ७५ वर्षांची महिला रात्री उशीराने करोनाबाधित असल्याचे समजले. त्यांच्या खासगी रुग्णालयातील कागदपत्रावर कॅनडा कॉर्नरचा पत्ता असल्याने त्यांना शोधणे अवघड झाले. कॅनडा कॉर्नर येथे त्यांचे पती आणि मुलगा, तर माणेकशा नगर परिसरात त्या आणि त्यांची मुलगी रहाते. महापालिकेच्या वतीने त्यांच्या कुटूंबातील अन्य तीन सदस्यांना तपासणीसाठी महापालिका रुग्णालयात नेण्यात आले. तसेच त्यांच्या संपर्कातील अन्य नागरिकांचा शोध सुरू आहे. दरम्यान, महापालिकेकडून माणेकशा नगर तसेच गंगापूर रोडवरील निर्मला कॉन्व्हेंट शाळेजवळील परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. देवळाली येथेही सात नवे रुग्ण आढळले आहेत. या परिसरातील सात ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत.
दुसरीकडे, मालेगाव परिसरात करोना ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी उशीरापर्यंत ५४ नवे करोना बाधित रुग्ण आढळले. येवला येथे सात रुग्ण करोनाबाधित असल्याचे उघड झाले. त्यानुसार त्या त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले.
मालेगावात २४ तासांत करोनाचे ६६ नवीन रुग्ण
मालेगाव : २४ तासात ६६ नवे रुग्ण आढळून आल्याने शहर आणि तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ४०९ वर पोहचली आहे. नव्याने आढळून आलेल्या बाधितांमध्ये राज्य राखीव दलाचे १२ जवान, सहा पोलीस आणि तीन महिन्याच्या एका चिमुरडीचा समावेश आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १६ वर पोहचली आहे.
२४ तासात पाच टप्प्यात एकूण २९३ करोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यात ६७ अहवाल सकारात्मक असून एक अहवाल आधीच्या बाधित रुग्णाच्या दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीचा आहे. शहरात बंदोबस्तावर असलेले राज्य राखीव दलाचे जवान आणि पोलिसांना करोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने तो चिंतेचा विषय झाला आहे. ताज्या अहवालात त्याचा पुन्हा प्रत्यय आला असून बाधित पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांची संख्या आता ९० पर्यंत गेली आहे. २८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
शहरात दिवसागणिक करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर त्याचा ताण पडत आहे. त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याची ओरड सातत्याने होत आहे. माजी आमदार आसिफ शेख यांनीदेखील यासंदर्भात तक्रार केली असून संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने योग्य उपचार उपलब्ध होण्यासाठी करोना रुग्णालयांची क्षमता वाढविण्याची मागणी केली आहे.
बंदोबस्तासाठी पुन्हा एकदा सुनील कडासने
करोनाविरूध्दच्या लढय़ासाठी आतापर्यंत बाहेरील अनेक अधिकाऱ्यांची मालेगावात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात अजून एका नावाची भर पडली आहे. सामाजिक अंतरचा नियम धाब्यावर बसविण्याच्या प्रवृत्तीमुळे शहरात करोना संसर्ग साखळी खंडित होण्यात मोठा व्यत्यय येत असल्याचा वारंवार आक्षेप घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या खांद्यावर आता मालेगावच्या बंदोबस्ताची संपूर्ण धुरा सोपविण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी यासंदर्भात नियुक्तीचे आदेश काढले आहेत.कडासने यांनी त्वरीत हा पदभार स्वीकारावा, असे या आदेशात नमूद आहे. यापूर्वी कडासने यांनी मालेगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदावर काम करत असतांना चांगली छाप पाडली आहे. शहराची त्यांना सखोल जाण आहे. तसेच उर्दू भाषेवरील प्रभुत्व, उत्तम संवाद कौशल्य यामुळे शहरवाासियांशी तेव्हां त्यांचे चांगले सूर जुळले होते.