नाशिक – परतीच्या पावसाने राज्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून युध्दपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले गेले आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या सहा लाख, ९० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाने प्रत्येकी ५० हजार या प्रमाणे अडीच हजार कोटी रुपये जमा केले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नाशिक: प्रलंबित मागण्यांसाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Victims of bulldozer action in UP welcome SC verdict
‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
eknath shinde slams maha vikas aghadi government in kalyan
विकास विरोधी, शिवसेनेचा विचार काँग्रेसच्या दावणीला बांधलेले सरकार उलथवून टाकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र

छत्रपती शाहू महाराज, संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे आजवर कधीही दिली न गेलेली विहित निकषापेक्षा दुप्पट मदत सरकारने दिल्याकडे लक्ष वेधले. दोन हेक्टरचा निकष होता. त्याऐवजी तीन हेक्टर क्षेत्रापर्यंत मदत देण्यात आली. गोगलगाय, सततच्या पावसाने या निकषात न बसणाऱ्या पिकांच्या नुकसानीचाही भरपाई देताना विचार झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>नाशिक : सरकार सारथीच्या पाठीमागे ठामपणे उभे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारे सारथीचे विभागीय केंद्र आहे. कार्यालयाचा या भागातील उच्च शिक्षण, प्रशासकीय सेवा, परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होईल. सरकार सारथीच्या पाठिशी ठामपणे उभे असून त्यांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ युवकांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम करेल. सारथी तरुणांचे करिअर घडवेल. वसतिगृहांचा विषय मार्गी लावला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्यात छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उपसमिती काम करीत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक भागात आनंदाचा शिधा पोहचला नसल्याच्या प्रश्नावर आतापर्यंत आठ तालुक्यात वितरण झाले असून दिवसभरात तो सर्वत्र दिला जाणार असल्याचे नमूद केले.